बाबा आमटे उर्फ़ मुरलीधर देविदास आमटे / Baba Aamte
बाबा आमटे उर्फ़ मुरलीधर देविदास आमटे या थोर कर्तृत्ववान, समाजसेवक पुरुषाचा जन्म २४ डिसेंबर १९१४ रोजी हिंगणेघाट, वर्धा, चंद्रपूर येथे झाला. बाबांनी केलेले समाजसेवेचे कार्य फार मोठे आहे. तसेच त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी केलेल्या सेवेत दिलेले मोलाचे योगदान हे सुद्धा अतुलनीय आहे. बाबा हे नाव त्यांना त्यांच्या आईवडिलांनीच ठेवले. समाजसेवेचा वसा बाबांनी लहानपणापासूनच घेतला होता. रविंद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधी यांच्या कार्याचा आदर्श त्यांनी डोळ्यासामोर ठेवूनच त्यांनी समाजसेवेचे धडे गिरवले.ते ब्राम्हण जहागिरदार होते. त्या काळी उच्च - निच्च अस भेद केला जात असे. बाबा आमटे यांचे वडील देखील अशाच काहीशा विचारसारणीचे होते.पालकांचा विरोध झुगारून बाबा आमटे नोकर चाकर मंडळींबरोबर खाणे - पिणे करत असत. त्या काळी निच्च समजल्या जाणार्या जाती-जमातीतींल लोकांच्या मुलांबरोबर बाबा अगदी मिळून मिसळून खेळत असत. त्यांनी आयुष्यात स्पृश्य- अस्पृश्य, उच्च - निच्च, लहान - मोठा, आपला -परका असा कोणत्याही प्रकारचा भेद न बाळगता सगळ्यांनाच मदत केली. बालपणापासूनच त्यांच्यात समाजकार्याची ओढ निर्माण झाली होती आणि तेव्हापासूनच त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा पाया त्यांच्याही नकळत रचला गेला.
अंध भिकारी दिसला,बाबांनी त्याच्या वाडग्यात चांदीची नाणी टाकली. त्यांची इतरांना मदत करण्याची समाजसेवक वृत्ती या प्रसंगातूनच दिसून येते. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेऊन वर्धा येथे एक चांगले उत्पन्न मिळवून देणारा वकिली व्यवसाय सुरु केला होता. आपल्या कुटुंबातील अपार संपत्ती आणि राहत्या चंद्रपूर तालुक्यातील ग्रासलेली गरीबी पाहून त्यांना धक्का बसला. हे न बघवल्याने त्यांनी आपल्या संपूर्ण मालमत्तेवर पाणी सोडले आणि सफाई कामगार तसेच मैला वाहून नेणारे कामगार इत्यादिंसोबत काम करण्यास सुरुवात केली. एकदा बाबांनी कोसळत्या पावसात थंडीने कुडकुडणारा एक कुष्ठरोगी पाहिला , त्याचे शरीर बाबांच्याने बघवले नाही ते त्याला तडक आपल्या घरी घेऊन आले आणि तेव्हापासून त्यांचे कुष्ठरोगावरील संशोधन सुरु झाले.. त्याकाळी कुष्ठरोग म्हणजे मागील जन्मीच्या पापाची बाधा अशी समजूत होती.
त्यांच्या पत्नी म्हणजेच पुर्वाश्रमीच्या साधनाताई गुळेशास्त्री यांना बाबांनी एका लग्न समारंभात वयस्कर नौकराच्या मदतीला लग्न समारंभ सोडून धावून जाताना पाहिले आणि बाबांनी साधनाताईंची हिच मदत करण्याची वृत्ती भावली. तो प्रसंग पाहिल्यावर त्यांना असे वाटले की हीचीच आपण आपली पत्नी म्हणून निवड करावी. म्हणून त्यांनी साधनाताईंच्या आईवडिलांकडे त्यांना मागणी घातली आणि त्यांच्या घरच्यांनीही लग्नाला चटकन होकार दिला व अशा रितीने त्यांचे १९४६ साली लग्न झाले.
बाबा म्हणत "साधना मला हळद, तुळस मिश्रीत दुध कित्येक वर्षे देत होती तिची अशी समजूत होती की यामुळे मी उजळ होईन आणि मी तिच्याकडे बघून हसलो की ती म्हणायची अहो, घशासाठी हे किती चांगले औषध आहे." साधनाताई या आनंदवन आणि कासारवड येथील बाबांनी आयोजित केलेल्या विविध शिबिरांमध्ये हातभार लावयच्या आणि बाबां एवढ्याच तत्परतेने समजसेवा करत होत्या.
लग्न झाल्यावर बाबा आमटेंनी वरोडा गावाबाहेर महारोग आणि कुष्ठरोगांनी ग्रासलेल्यांसाठी काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी वरोड्यायाजवळ ११ दवाखाने सुरु केले आणि नंतर आनंदवन सुरु केले. आनंदवन येथे पाण्यासाठी ते ४७ अंश सेल्सियस या तपमानात देखील जमीन खणत राहिले. त्यांनी कुष्ठरोगावरील उपायावरील एक अभ्यासक्रम पूर्ण केला इतकेच नव्हे तर त्यांनी कुष्ठररोगावरील जंतू वाढवण्यासाठी स्वतःच्या शरिरावरच प्रयोग केले पण याचा काहीच उपयोग न झाल्यामुळे हे प्रयोग त्यांना नंतर ते बंद करावे लागले.एखाद्या रोगाची चाचणी स्वतःच्या शरीरावार करणार्या बाबांच्या धाडसी आणि चिकित्सक वृत्तीचा प्रत्यय मला या प्रसंगातून आला.
आनंदवन ही त्यांनी उभारलेले कुष्ठरोग्यांसाठीचे घर १९५१ साली अधिकृत करण्यात आले आणि सरकारने त्यांना आनंदवनाच्या विस्तारासाठी काही भूखंडही दिला. यानंतर २ रुग्णालये, १ विद्यापीठ, १ अनाथाश्रम, अंध आणि मूकबधिर मुलांसाठी तसेच तांत्रिकी प्रशिक्षणासाठी १ शाळा इत्यादींची स्थापना या आनंदवनात नव्याने झाली.महारोगी सेवा समितीची स्थापना देखील त्यांनी दरम्याननच्या काळात केली. पुढे बाबांनी या आनंदवनातील कुष्ठरोग्यांची लग्ने देखील आनंदवनातच लावून दिली, यामुळे कित्येक कुष्ठरोग्यांना संसारसुख तर मिळायच शिवाय अनेक कुटूबांना आधार मिळला. एवढ्यावरच बाबा थांबले नाहीत त्यांनी आनंदवनात शेती सुरु केली आणि अनेक प्रकारच्या भाज्यांची लागवड तेथील मळ्यांत केली.यामुळे तेथील लोकांना रोजगाराचा एक नवीन मार्गच बाबांनी उघडून दिला. प्रत्येक माणासने स्वकर्तृत्वानेच सगळे काही करायचे आणि मिळवायचे असते ते नेहमी बोलत.
त्यांनी आनंदवनात देखील अनेक छोट्या संस्था प्रस्थापित केल्या. तेथील कुष्ठरोग्यांना विविध व्यवसाय सुरु करुन दिले.कुष्ठरोग्यांच्या करमणुकीसाठी त्यांनी अनेक वाद्यवृंद, संगीताचे कार्यक्रम देखील राबविले आणि ते आजही त्याच उत्साहाने आणि त्याच जोमाने राबविले जातात.बाबांना कला क्षेत्रात निपुण असलेल्यांसाठी आनंदवनातच कलेचे दालन उघडे करून दिले. अशा हस्तकौशल मंडळींसाठी त्यांनी विविध प्रकारच्या कार्यशाळा भरवल्या.त्यामुळे शिल्पकाम, चित्रकला यांसारख्या कलांमध्ये रसिकता असलेल्यांना त्यांच्या कलेला वाव तर निर्माण झालाच शिवाय स्वंयंरोजगाराचे साधन ही उपलब्ध झाले. बाबा म्हणायचे, "सुख जर वाटलं नाही तर ते संपून जातं" म्हणून त्यांनी नेहमी सुख वाटलं पण दुख कधीच वाटलं नाही. सगळ्यांच्या सुखासाठी झटले बाबा, पण आपल्या सुखाची तमा बाळगली नाही.
त्यांनी लावलेल्या त्या छोट्याशा रोपट्याचे आता विशाल अशा वटवृक्षात रुपांतर झालेले आहे. त्यांचा आश्रम हा सर्व सोयीसुविधांनी सक्षम असा आज आपल्याला बघायला मिळेल आणि या आश्रमामध्ये जवळ जवळ ३००० कुष्ठरोगी गुण्यागोविंदाने नांदत आहेत.
बाबांनी २ 'भारत जोडो' चळवळींची स्थापना केली.पहिली भारत जोडो चळवळ म्हणजे १९८५ सालची काश्मीर ते कन्याकुमारी आणि दुसरी १९८८ सालची आसाम ते गुजरात. या दोन्ही चळवळी स्थापन करण्यामागे शांतता आणि पर्यावरणविषयक जागरुकता ही मुख्य उद्दीष्टे होती. तसेच त्यांनी नर्मदा बचाव आंदोलन, सरदार सरोवर आंदोलन आणि वन्य जीवन संरक्षण यांसारख्या इतर काही चळवळींमध्येही सक्रियरित्या भाग घेतला. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मिळालेल्या असंख्य पुरस्कारांच्या विक्रीतून आलेले जवळपास १५०० लाखाहूनही आधिक रक्कम आनंदवन या त्यांच्या संस्थेलाच देण्यात आली. बाबांनी स्वतःसाठी काहीच केले नाही जे काही केले ते समाजासाठी केले. आपल्या गर्भश्रीमंतीला लाथाडून समाजासाठी अहोरात्र झटणारा असा एखादा माणूस आपल्याला कदाचितच बघायला मिळेल.समाजसेवे साठीच बाबा झटले आणि अखेरच्या श्वासापर्यंत समाजसेवाच करत राहीले. त्यांच्या कर्तबगारीची आणि कार्याची दखल फक्त भारतातीलच नव्हे तर इतर देशांतील बर्याच समाजसेवक संस्थांनी आणि बड्या मंडळींनी घेतली.
बाबांना अनेक प्रकारचे पुरस्कार देऊन त्यांच्या कर्तबगारीचा सत्कार करण्यात आला. बाबांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी खालीलप्रमाणे आहे.
रॅमन मॅगसेसे पुरस्कार
डेमियन डट्टन पुरस्कार, अमेरिका - १९८३ .कुष्ठरोग्यांप्रीत्यर्थ कार्यासाठी दिला जाणारा अत्युच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार .
संयुक्त राष्ट्रे यांचा मानवी हक्क पुरस्कार १९९८
आंतरराष्ट्रीय जिराफे पुरस्कार, अमेरिका १९८९
टेंपल्टन् बहुमान,अमेरिका (मानवतावादी कार्यासाठी) १९९०
पर्यावरण विषयक कामासाठी संयुक्त राष्ट्रे यांचा रोल ऑफ ऑनर १९९१
पर्यावरणासंबंधीचा ग्लोबल ५०० पुरस्कार १९९१
राईट लाईव्हलीहूड अवार्ड, स्वीडन - १९९१. (पर्यायी नोबल पुरस्कार) (नर्मदा बचाव आंदोलनासाठी, मेधा पाटकर यांच्या सोबत संयुक्तपणे).
पद्मश्री १९७१
पद्मविभूषण १९८६
अपंग कल्याण पुरस्कार १९८६
महाराष्ट्र सरकारचा सावित्री बाई फुलॆ पुरस्कार १९९८
गांधी शांतता पुरस्कार १९९९
सामाजिक सुधारणांसाठीचा डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार १९९९
महाराष्ट्र भूषण पुरस्कार २००४ (महाराष्ट्र सरकार चा सर्वोच्च सन्मान) १-मे-२००५ रोजी त्यांना आनंदवन येथे देण्यात आला.
मध्य प्रदेश सरकारचा इंदिरा गांधी पुरस्कार १९८५
पहिला जी. डी. बिर्ला पुरस्कार १९८६
महाराष्ट्र सरकारचा दलित मित्र पुरस्कार १९७४
राष्ट्रीय भूषण पुरस्कार १९७८
जमनालाल बजाज पुरस्कार १९७९
एन डी दिवान पुरस्कार १९८०
राजा राम मोहनराय पुरस्कार १९८७
भरतवास पुरस्कार २००८
जी डी बिर्ला अंतरराष्ट्रीय पुरस्कार १९८८
महाराष्ट्र सरकारचा आदिवासी सेवक पुरस्कार १९९१
कुमार गंधर्व पुरस्कार १९९८
जस्टिस् कॆ एस हॆग्डॆ पुरस्कार, कर्नाटक १९९८
गौरव डि.लिट् - नागपूर विद्यापीठ १९८०
गौरव डि.लिट् - पूणे विद्यापीठ, १९८५-८६
देशिकोत्तम (गौरव डॉक्टरेट) १९८८ -विश्वभारती,शांतीनिकेतन, पश्चिम बंगाल
बाबांनी साहित्य क्षेत्रातही महत्त्वाचे योगदान दिले आहे.बाबा आमट्यांनी खालील पुस्तके लिहिली आहेत :
'ज्वाला आणि फुले' - कवितासंग्रह
'उज्ज्वल उद्यासाठी' (काव्य)
'माती जागवील त्याला मत'
बाबांनी केलेले समाजसेवेचे कार्य हे अतिशय भव्य स्वरुपाचे आहे. त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी बांधलेले आनंदवन हे त्यांच्या मेहनतीचं मूर्तिमंत उदाहरण आहे.असा हा थोर पुरुष दिनांक ९ फेब्रुवारी २००८ रोजी ल्युकेमिआ या आजारावर उपचार घेत असतानाच काळाच्या पदद्याआड गेला...!!! आणि संपूर्ण आनंदवनच नव्हे तर संपुर्ण भारत देशाने एक थोर समाजसेवक गमावला.त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचे अंतिम संस्कार अग्नी न देता (हिंदूंप्रमाणे) करण्यात आले आणि त्यांचे पार्थिव पुरण्यात आले. बाबांच्या पश्चात त्यांची दोन मुले डॉ.विकास आमटे आणि डॉ. प्रकाश आमटे हे आनंदवनाची ज्योत बाबांच्याच जोमाने तेवत ठेवण्यास हातभार लावत आहेत. आजही बांबांच्या आठवणी आनंदवनात आहेत. तिथल्या लोकांमध्ये ते अजूनही जिवंत आहेत. आनंदवनात वावरताना बाबांचा सहवास जाणवतो.
No comments:
Post a Comment