Showing posts with label इतिहास. Show all posts
Showing posts with label इतिहास. Show all posts

Wednesday, 15 May 2013

भारतीय इतिहास

भारतीय इतिहास - खास स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी...

भारतीय इतिहासातील काही महत्त्वपूर्ण तारखा:
१७५७-१८९९:
१७५७ प्लासिची लढाई (२३ जून), लार्ड क्लाइवने भारतात ब्रिटिश साम्राज्याचा पाया रोवला
१७६१ पनिपतचे तिसरे युद्ध (१४ जानेवारी), शाह आलम II भारताचा सम्राट झाला
१७६४ बक्सारचे युद्ध (२३ ओक्टोबर)
१७६५ रोबर्ट क्लाइव बंगालचा गवर्नर झाला
१७६७ पहिली मौसुरची लढाई (१७६७-६९)
१७७३ रेग्युलेटिंग एक्ट
१७७५ पहिले मराठे-ब्रिटिश युद्ध (१७७५-८२)
१७८०  दूसरी मौसुरची लढाई (१७८०-८४)
१७८४ पिट्टस इण्डिया एक्ट (इस्ट इंडिया कंपनी एक्ट) (१३ ऑगस्ट)
१७९० तीसरी मौसुरची लढाई (
१७९०-९२)
१७९९ चौथी मौसुरची लढाई - टीपू सुलतानचा मुर्त्यु (४ मे)
१८०२ दुसरे मराठे-ब्रिटिश युद्ध व बेसिनचा तह (वसईचा तह, मराठे-ब्रिटिश ३१ डिसेंबर)
१८०९ अमृतसरचा तह (शीख-ब्रिटिश २५ एप्रिल)
१८१७ तिसरे मराठे-ब्रिटिश युद्ध (
१८१७-१८)
१८२९ सती बंदी कायदा
१८३० राजा राम मोहन रॉय इंग्लैंड भेट
१८३३ राजा राम मोहन रॉय मृत्यु (२७ सप्टेम्बर)
१८३९ पहिले अफगान युद्ध (अफगानी सैन्य व ब्रिटिश-भारतीय सैन्य) (
१८३९-४२)
१८४५ पहिले शीख युद्ध (१८४५-४६)
१८५२ दुसरे एंग्लो-ब्रम्हा युद्ध (ब्रिटिश-भारतीय सैन्य-ब्रम्हादेश)
१८५३ पहिली रेल्वे धावली (मुंबई-ठाणे, १६ एप्रिल), कोलकाता टेलीग्राफ लाइन
१८५७ ब्रिटिश सरकरविरुद्ध पहिला देशव्यापी उठाव
१८६० आय पी सी आणि सी पी 
सी या कयादेसहितांची निर्मिती
१८६१ रविंद्रनाथ टागोर जन्म (७ मे), मुंबई, कोलकाता, मद्रास पहिली उच्च न्यायालये
१८६७ महात्मा गांधी जन्म (२ ऑक्टोबर)
१८७८ वर्न्याकुलर प्रेस एक्ट मंजूर (लिटन) टार १८८१ ला रद्द झाला
१८८२ हंटर कमीशन
१८८५ भारतीय राष्ट्रीय कांग्रेसची स्थापना (३१ डिसेंबर)
१८८९ पंडित जवाहरलाल नेहरू जन्म (१४ नोवेम्बर)

१९००-१९४८:
१९०५ बंगालची फालनी
१९०६ मुस्लिम लिगची स्थापना (३० डिसेंबर)
१९०७ भारतीय राष्ट्रीय कांग्रेसमध्ये फुट
१९०८ टिलाकाना काल्या पाण्याची शिक्षा
१९११ दिल्ली दरबार, राजा व रानीची भारताला भेट, दिल्ली देशाची राजधानी करण्यात आली
१९१४ पाहिले महायुद्ध (२८ जुलै), टिलक तुरुंगातून सुटका व होमरूल चालवल सुरु (अनि बेझंट)
१९१६ लखनौ करार (मावल व जहल ऐक्य), भारतीय राष्ट्रीय कांग्रेस व मुस्लिम लीग समझोता
१९१८ पहिले महायुद्ध संपले (११ नोवेम्बर)
१९१९ मौन्तेगु-चेम्सफोर्ड सुधारना कायदा, रौलेट कायदा सामंत, खिलाफत चालवल सुरु
१९१९ जलियनवाला बाग़ हत्याकांड (१३ एप्रिल)
१९२० असहकार आन्दोलन सुरु (१ ऑगस्ट)
१९२१ एक वर्षात देशात ३९६ संप (मुलाशी सत्याग्रह)
१९२२ चौरीचौरा प्रकरण (५ फेब्रुवारी), गांधीजी वर देशद्रोह आरोप व ६ वर्षाची शिक्षा
१९२३ स्वराज पक्षाची स्थापना, १९२५ ला कांग्रेसमध्ये विलीन
१९२४ गांधीजी ची तुरुंगातून सुटका
१९२७ सायमन कमीशन
१९२८ लाला लाजपतराय मुर्त्यु (१७ नोवेम्बर), नेहरू रिपोर्ट
१९२९ संपूर्ण स्वराज्याची मगनी
१९३० सविनय कयादेभंग (१४ फेब्रुवारी), दांडी सत्याग्रह (६ एप्रिल), पहिली गोलमेज परिषद
१९३१ गांधी-अयार्विन करार (५ मार्च), दूसरी गोलमेज परिषद
१९३२ पुणे करार (गांधी-आंबेडकर), तीसरी गोलमेज परिषद
१९३५ भारत विषयक कायदा
१९३७ प्रांतिक निवडणुका
१९३९ दुसरे महायुद्ध सुरु (१ सप्टेम्बर)
१९४० वैयक्तिक सत्याग्रह चलवल (१७ ऑक्टोबर)
१९४१ सुभाष चन्द्र बोस भारतातून सुटका, प्रतिसरकारे
१९४२ क्रिप्स योजना, भारत छोड़ो आंदोलन (८ ऑगस्ट)
१९४६ त्रिमंत्री योजना
१९४७ भारताचे विभाजन, भारत व पाकिस्तान वेगले स्वतंत्र देश निर्माण
१९४८ गांधी हत्या (३० जानेवारी)

Wednesday, 1 May 2013

महाराष्ट्राचा इतिहास

महाराष्ट्रातील नद्या, पर्वत आणि इतर स्थळांचा रामायण, महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. परंतु विश्वसनीय ऐतिहासिक साधने वापरून लिहिलेला महाराष्ट्राचा इतिहास इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकापासून उपलब्ध आहे.
राजकीय कालखंडानुसार महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, देवगिरीचे यादव, अल्लाउद्दिन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक, पोर्तुगीज, विजापुर, मुघल, मराठा, हैदराबादचा निजाम, इंग्रज, इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडात व्यापले होते.

प्राचीनकाळ
नावाचा उगम:
महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महा राष्ट्र" या नावाने ओळखले जावू लागले असे ह्युएन-त्सांग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे. काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ महाररट्टा यांच्याशी लावतात परंतु काहींच्या मते हे नाव महा-कंतारा (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आह

मौर्य साम्राज्याचा काळ:
महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) अंतर्गत होता. या काळात महाराष्ट्राने भरभरटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.

सातवाहन साम्राज्याचा काळ:
सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराण होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतेचा मानला जातो. अर्थात्‌ या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरूष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा महत्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.

वाकाटकांचा काळ:वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळांत महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत राजाश्रयामुळे उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळांतील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.
कलाचूरींचा काळ:
वाकाटकांनंतर कलचुरी राजघराणे इ.स. च्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.

बदामी चालूक्य आणि कल्याणी चालूक्यांचा काळ:वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणी इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमान होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.

राष्ट्रकुटाचा काळ:दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्रकूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे कृष्ण पहिला या राष्ट्रकूट राजाने बांधले.

यादवांचा काळ:महाराष्ट्राच्या कांहीं भागावर कल्याणीच्या चालुक्यांनी सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवानी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१० पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता सपुष्टात आणली.
यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्ती सांप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.

मध्ययुगीन इतिहास व इस्लामी राज्य:
महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्री भाषेच्या वापरामुळे ३र्‍या शतकापासून नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. महाराष्ट्र त्या काळात 'दंडकारण्य' म्हणून ओळखले जात असे. श्रीराम व हनुमान यांची भेट पंचवटी(नशिक)येथे झाली होती. कालांतराने महाराष्ट्र अशोक या बौद्ध राजाच्या मगध साम्राज्याचा एक भाग झाला. सोपारा हे बंदर (हे आजच्या मुंबईच्या उत्तरेस असून नाला सोपारा या नावाने ओळखले जाते) प्राचीन भारताच्या व्यापाराचे केंद्र होते. या बंदरातून पूर्व आफ्रिका, मेसोपोटेमिया, एडन व कोचीन या ठिकाणी व्यापार होत असे. मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सातवाहन यांनी ख्रि.पू २३०- २२५ पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्री भाषा, (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रूपांतरित झाली) सातवाहनांची राजभाषा होती. इ.स ७८ रोजी महाराष्ट्राचा राज्यकर्ता गौतमीपुत्र सत्कारणी (शालिवाहन) हा होता. त्याने सुरू शालिवाहन शक आजही रूढ आहे.
वाकाटक (इस.२५०-५२५) च्या राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. इ.स. ७५३ रोजी राष्ट्रकूट साम्राज्य महाराष्ट्रावर राज्य करीत होते. इ.स ९७३ रोजी चालुक्यांनी पुन्हा सत्ता हस्तगत केली आणि महाराष्ट्राच्या काही भागांवर इ.स.११८९ पर्यंत राज्य केले. त्यानंतर देवगिरीच्या यादवांनी महाराष्ट्रावर राज्य प्रस्थापीत केले.
१३व्या शतकात महाराष्ट्र प्रथमच इस्लामी सत्तेखाली आला. दिल्लीचे अल्लाउद्दीन खिलजी व नंतर मोहम्म्द बिन तुघलक यांनी दख्खनचे काही भाग काबीज केले. इ.स.१३४७ तुघलकांच्या पडावानंतर बिजापूरच्या बाहमनी सुलतानांनी सुमारे १५० वर्षे राज्य केले. १६व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मुघल साम्राज्यांशी संलग्न असलेल्या अनेक इस्लामी राजवटींनी मध्य महाराष्ट्र व्यापलेला होता तर किनारपट्टीवर मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापाराच्या हेतूने आलेल्या पोर्तुगीज यांचा अंमल होता.

मराठा साम्राज्याचा उदय:
१६४७ मध्ये सतरा वर्षांच्या शिवाजीराजे भोसल्यांनी आदिलशहाच्या ताब्यातील तोरणगड जिंकला आणि १७व्या शतकाच्या मध्यास पश्चिम महाराष्ट्रात मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. शिवाजीराजांमुळे प्रथमच विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्याविरोधात स्वतंत्र मराठा राज्य उदयास आले. यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात शिवाजी महाराजांच्या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवाजी महाराजांना १६७४ मध्ये राज्याभिषेक झाला.
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र संभाजीराजे भोसल्यांना औरंगजेब यांनी पकडले व त्यांची हत्या घडवून आणली. मोगलांनी संभाजीराजांचे धाकटे बंधू राजाराम यांना दक्षिणेस पिटाळले. राजाराम भोसल्यांनी जिंजी किल्ल्याची दुरुस्ती १८व्या शतकाच्या सुरुवातीस केली, जेव्हा तेथील परीस्थिती सुधारली होती.
राजारामांचे पुतणे शाहू भोसले हे १७०८ साली मराठी दौलतीच्या गादीवर बसले. या कामास त्यांचे पेशवे (मुख्य मंत्री) बाळाजी विश्वनाथ यांची साथ मिळाली. राजारामांची विधवा पत्नी ताराबाई यांच्याशी शाहू भोसले यांचे मतभेद होते.
चार दशकांनंतर 'छत्रपतींच्या' (भोसले राजघराण्यातील) नावाने राज्यकारभार पाहणार्‍या पेशव्यांच्या हाती मराठा साम्राज्याची सूत्रे आली. मोगलांना हरवून पेशवे भारताचे नवे राज्यकर्ते म्हणून उदयास आले.

पेशव्यांचा काळ:बाळाजी विश्वनाथ पेशवे व त्यांचे पुत्र बाजीराव (पहिले) यांनी मराठा राज्य वाढवले. त्यांनी मोगल राज्यांकडून कर व सरदेशमुखी व चौथाई यांच्यासारखा सारा वसूल करण्याची प्रथा पाडली. पेशव्यांच्या अंमलाखाली प्रगत व्यापार, अर्थकारण यांचे जाळे अस्तित्वात आले. मुख्य कार्यालय पुण्यात व शाखा गुजरात, गंगेचे खोरे आणि दक्षिणेपर्यंत वाढल्या. शेतीचा देखील विस्तार झाला. त्याचबरोबर पेशव्यांनी दर्यावर्दी कान्होजी आंग्रे यांना हाताशी धरून कुलाबा व पश्चिम तटावरील इतर बंदरे उदयास आणली. या जहाजांनी मुंबईतील ब्रिटिश, गोव्यातील, वसईतीलदमण मधील पोर्तुगीज यांना काबूत ठेवले. त्याचबरोबर मराठा साम्राज्याच्या बाहेर आपल्या सरदारांना जहागिरीं देऊन त्यांच्यामार्फत आपले स्वामित्व अबाधित ठेवले. पेशव्यांनी ग्वाल्हेर शिंदेंना, इंदूर होळकरांना, बडोदा गायकवाडांना तर धार पवारांना दिले. पेशव्यांनी केवळ महाराष्ट्रच नव्हे तर दिल्ली (पानिपत), गुजरात (मेहसाणा), मध्य प्रदेश (ग्वाल्हेर, इंदूर), व दक्षिणेस तंजावरपर्यंत राज्य वाढविले.
इ.स. १७६१ साली पानिपतच्या तिसर्‍या लढाईत अफगाण सेनानी अहमदशाह अब्दालींनी पेशव्यांचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याचा एकसंधपणा नष्ट झाला व साम्राज्याची अनेक संस्थानांत विभागणी झाली. पेशव्यांचे माजी सरदार आपआपले राज्य सांभाळू लागले तर पुणे पेशवे परिवारांकडे राहिले. भोसल्यांची एक शाखा कोल्हापूरात गेली तर मुख्य शाखा सातारा येथेच राहिली. कोल्हापूरचे भोसले म्हणजेच राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांचे वंशज ज्यांनी इ.स.१७०८ रोजी शाहूंचे राज्य अमान्य केले. १९व्या शतकापर्यंत कोल्हापूरच्या भोसल्यांनी छोट्या भूभागावर राज्य केले.

ब्रिटीश सत्ता:ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात बस्तान घातले असताना मराठे व ब्रिटिश यांच्यात इ.स.१७७७-१८१८ च्या दरम्यान तीन युद्धे झाली. इ.स.१८१९ रोजी ब्रिटिशांनी मराठ्यांचे राज्य काबीज केले. महाराष्ट्र ब्रिटिशांच्या बॉम्बे राज्याचा एक भाग होता. बॉम्बे राज्यात कराची ते उत्तर दख्खन भाग समाविष्ट होते. अनेक राज्यकर्ते ब्रिटिशांचे वर्चस्व मानून आपाआपले राज्य संभाळीत होते. आजचे नागपूर, साताराकोल्हापूर हे त्या काळात विविध राज्यकर्त्यांच्या ताब्यात होते. सातारा इ.स.१८४८ रोजी बॉम्बे राज्यात तर नागपूर इ.स.१८५३ रोजी नागपूर प्रांतात (व नंतर मध्य प्रांतात) सामिल करण्यात आला. बेरार हे हैदराबादच्या निझामाचा एक भाग होते. ब्रिटिशांनी इ.स १८५३ रोजी बेरार काबीज केले व १९०३ रोजी मध्य प्रांतात समाविष्ट केले. मराठवाडा निझामाच्या अंमालाखाली राहिला. ब्रिटिशांना सामाजिक सुधारणा तसेच अनेक नागरी सोयी-सुविधा आणल्या. परंतु त्यांच्या भेदभावी-निर्णयांमुळे व पारतंत्र्याच्या जाणिवेमुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस लोकमान्य टिळक या नेत्यानी ब्रिटिशांविरुध्द लढा उगारला जो पुढे महात्मा गांधी यांनी चालवला. मुंबई येथे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक महत्वाचे केंद होते.

महाराष्ट्र राज्याची निर्मिती:भारताला इ.स.१९४७ रोजी स्वातंत्र्य लाभले.भारताच्या स्वातंत्र्यानंतर भाषेप्रमाणे प्रांत निर्मिले जात होते. परंतु भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्यावरुन मराठी-जनात क्षोभ उसळला. अखेर १०५ जणांच्या बलिदानानंतर, १ मे १९६० ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याचा मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. १९ व्या शतकापासून विविध मराठी राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते व समाजाने मोठ्या प्रमाणावर सामाजिक उत्क्रांती आणि राजकीय स्वातंत्र्याकरीता मोलाचे योगदान केले.१९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागास एकत्र आणले. स्वातंत्र्य उत्तर राजकीय दृष्ट्या यशस्वी सहकारी चळवळी आणि जातीय गणितांतील प्रभुत्वाने कॉंग्रेस पक्षाचे शासनात वर्चस्व राहीले. राजकीय समीकरणात मराठा समाज व पश्चिम महाराष्ट्र सदैव अग्रणी राहीला. श्री. य. दि. फडके या इतिहासकारांनी स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या इतिहासाचा काळाचा उद्बोधक आढावा घेतला आहे.

संयुक्त महाराष्ट्र चळवळ:स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारे मुंबई, कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा, खानदेश व अजूनही महाराष्ट्राबाहेरच असलेले डांग, बेळगाव, निपाणी, कारवारबिदर हे भाग अभिप्रेत होते. साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय या सर्व अंगानी ही चळवळ उभी राहिली.

महाराष्ट्रातील जिल्हे:महाराष्ट्र राज्य ३५ जिल्ह्यात विभागले गेले आहे. या जिल्ह्यांचे ६ समूह अथवा विभाग आहेत- औरंगाबाद, अमरावती,कोकण, नागपूर, नाशिक व पुणे. हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत राजस्व विभाग आहेत.
भौगोलिक, ऐतिहासिक व राजकीय-मतांनुसार महाराष्ट्रात पाच मुख्य विभाग आहेत: विदर्भ किंवा बेरार (नागपूर आणि अमरावती विभाग), मराठवाडा (औरंगाबाद विभाग), खानदेश व उत्तर महाराष्ट्र विभाग (नाशिक विभाग), देश किंवा पश्चिम महाराष्ट्र विभाग (पुणे विभाग) आणि कोकण (कोकण विभाग).

अर्थव्यवस्था:७०च्या दशकातील योग्य आर्थिक धोरणांमुळे महाराष्ट्र राज्य भारतातील अग्रगण्य औद्योगिक राज्य बनले.आर्थिक क्षेत्रात पहिला क्रमांक मिळविण्याच्या प्रयत्न करणाऱ्या आणि प्रगतिशील, पुरोगामी अशा राज्यांपैकी ते एक आहे. परंतु महाराष्ट्रात विकास सारख्या प्रमाणात होऊ शकला नाही. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला पण विदर्भ, मराठवाडा व कोकण हे भाग मागास राहिले. महाराष्ट्रातील राजकारणात व नोकरशाहीतही पश्चिम महाराष्ट्राचा अधिक प्रभाव आहे.
राज्याचे २००४ सालचे वार्षिक उत्पन्न (gross state domestic product) १०६ अब्ज अमेरिकन डॉलर इतके आहे. महाराष्ट्र भारतातील दुसरे सर्वांत जास्त शहरीकरण झालेले राज्य आहे.
एकूण राष्ट्रीय औद्योगिक उत्पन्नापैकी १३% महाराष्ट्राचे योगदान आहे. ६४.१४% लोक कृषी व संबंधित उद्योगात रोजगार मिळवतात. एकूण वार्षिक उत्पन्नापैकी (GSDP) ४६% हिस्सा हा कृषी व संबंधित उद्योगातून मिळतो.
  • महाराष्ट्रातील प्रमुख उद्योगधंदे - रासायनिक आणि संबंधित उत्पादने, विद्युत आणि साधी यंत्रे, कापड, पेट्रोलीयम आणि तत्सम उद्योग हे आहेत.
  • इतर महत्त्वाचे उद्योगधंदे - धातू उत्पादने, वाईन द्राक्षापासून तयार केले जाणारे मद्य), दागिने, औषधे, अभियांत्रिकी सामान, यांत्रिक सामान, पोलाद व लोह उद्योग, प्लास्टिक वायर्स.
  • महत्त्वाची पिके- आंबा, द्राक्षे, केळी, संत्री, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि कडधान्ये.
  • महत्त्वाची नगदी पिके (cash crops)- शेंगदाणे, कापूस, ऊस, हळकुंड व तंबाखू.
सिंचीत जमीन ३३,५०० कि.मी इतकी आहे.
मुंबई, महाराष्ट्राची राजधानी, भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. जवळजवळ सर्व प्रमुख बँका, आर्थिक संस्था, विमा संस्था व गुंतवणूक संस्थांची मुख्य कार्यालये येथे आहेत. बॉलिवूड या हिंदी चित्रसृष्टीचे व मराठी दूरचित्रवाणी व चित्रपटांचे केंद्र मुंबईत आहे. मुंबई शेअर बाजार (भारतातील सर्वांत मोठा व आशियातील सर्वांत जुना) ही महत्त्वाची संस्था मुंबईत आहे. महाराष्ट्र सरकारने सॉफ्टवेर पार्क्स पुणे, मुंबई, नागपूर व नाशिक येथे स्थापन केली आहेत.
कोळसानिर्मित व अणुनिर्मित वीज या क्षेत्रात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. जट्रोफा लागवडीसाठी महाराष्ट्राने नवा प्रयोग सुरू केला आहे. ४१% पेक्षा जास्त S&P CNX 500 कंपन्यांची महाराष्ट्रात कार्यालये आहेत.


लोकजीवन:
महाराष्ट्राच्या रहिवाशांना महाराष्ट्रीय अथवा मराठी माणूस असे संबोधतात. २००१च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ९,६७,५२,२४७ आहे. महाराष्ट्र लोकसंख्येनुसार भारतातील दुस-या क्रमांकाचे राज्य आहे. मराठी बोलणा-यांची संख्या ६२,४८१,६८१ आहे. महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे केवळ ११ देश आहेत. लोकसंख्येची घनता ३२२.५/१ कि.मी. इतकी आहे. लोकसंख्येपैकी ५.०३ कोटी पुरुष व ४.६४ कोटी स्त्रिया आहेत. महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी ४२.४% आहे. लिंग-गुणोत्तर (sex-ratio) १,००० पुरुषांमागे ९२२ महिला इतका आहे. ७७.२७% (पु-८६.२%, स्त्रि-६७.५%) लोकसंख्या साक्षर आहे. साक्षरता-वाढीचा दर १९९१-२००१ला २२.५७% होता.
मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. त्याचबरोबर हिंदी व इंग्लिश शहरी भागात बोलली जाते. उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात अहिराणी तर दक्षिण कोकणात मालवणी या मराठीच्या बोलीभाषा बोलल्या जातात. दख्खनच्या देश भागात 'देशी' व विदर्भात 'व-हाडी' या बोलीभाषा अस्तित्वात आहेत.
राज्यात ८०.२% हिंदू, १०.६% मुस्लिम, ६% बौद्ध, १.३% जैन व १% ख्रिश्चन धर्मीय जनता आहे. काही प्रमाणार ज्यू व पारशी धर्मीय देखील आहेत.

संस्कृती: महाराष्ट्रातील काही मंदीरे अनेक शतकांपासूनची आहेत. मंदीरांच्या शिल्पशैलीत उत्तर व दक्षिण भारताचा मिलाप आढळतो. मंदीरांवर हिंदू, बौद्ध व जैन संस्कृतींचा ठसा आहे. औरंगाबाद जवळील अजिंठा व वेरुळची लेणी जगप्रसिध्द आहेत. मोगल शिल्पशैलीची झलक औरंगाबाद येथीलच बीबी का मकबरा येथे पहायला मिळते. महाराष्ट्रात अनेक दुर्ग व किल्ले आहेत. रायगड, प्रतापगड व सिंधुदुर्ग ही काही उदाहरणे.
महाराष्ट्राचे लोकसंगीत समृद्ध आहे. गोंधळ, लावणी, भारुड आणि पोवाडा हे प्रकार विशेष लोकप्रिय आहेत. मराठी साहित्य भारतातील अग्रगण्य असे असून ज्ञानेश्वर (भावार्थदीपिका अर्थात 'ज्ञानेश्वरी'चे रचयिते), पु.ल. देशपांडे, प्र.के.अत्रे, व्यंकटेश माडगूळकर हे काही प्रमुख लेखक व कवी आहेत. प्रत्येक वर्षी अनेक मराठी पुस्तके प्रकाशित होत असतात. मराठी नाटक, चित्रपट व दूरचित्रवाणीचे केंद्र मुंबई येथे आहे आणि बहुतेक कलाकार सर्व माध्यमातून कामे करतात. मराठी चित्रपटसृष्टीतील काही प्रसिध्द व्यक्ति - पु.ल.देशपांडे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, महेश कोठारेआणि व्ही. शांताराम. मराठी नाटकांचा जुना काळ हा कोल्हटकर, खाडिलकर, देवल, गडकरी व किर्लोस्कर आदी लेखकांनी गाजवला. तो काळ संगीतनाटके आणि नाट्यसंगीताचा होता. याच काळात बालगंधर्व, केशवराव भोसले, भाऊराव कोल्हटकर व दीनानाथ मंगेशकर या गायक-कलावंतानी रंगभूमीची सेवा केली
मराठी दूरचित्रवाणी वाहिन्या पुढीलप्रमाणे - दूरदर्शन-सह्याद्री, झी मराठी व ई टीवी मराठी. मागील काही वर्षांपासून मराठी वाहिन्यांनी लोकप्रियता मिळवली असून बहुतेक वाहिन्या २४ तास सुरू असतात. परदेशस्थ मराठी माणसेदेखील यांचा आस्वाद घेतात.
महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती भागानुसार बदलते. कोकणात भात व मासे लोकप्रिय आहेत तर पूर्व महाराष्ट्रात गहू, ज्वारी आणि बाजरी जास्त खाल्ली जाते. सर्व प्रकारच्या डाळी, कांदे, बटाटे, टॉमेटो, मिरची, लसूण व आले हे पदार्थ मराठी जेवणात सर्रास वापरले जातात. सामिष अन्न अनेक जणांना आवडते
मराठी स्त्रियांचा पारंपारिक वेष नऊवारी साडी तर पुरुषांचा धोतर/पायजमा आणि सदरा असा आहे. परंतु शहरी भागात आधुनिक पेहराव केले जातात.
भारतातील इतर प्रांतांप्रमाणेच क्रिकेट हा खेळ येथेही लोकप्रिय आहे. कबड्डी सुध्दा खेळली जाते. लहान मुलांत विटी-दांडू, पकडा-पकडी हे खेळ लोकप्रिय आहेत.
दिवाळी, रंगपंचमी, गोकुळाष्टमी व गणेशोत्सव हे महाराष्ट्राचे मुख्य उत्सव आहेत. यांपैकी गणेशोत्सव सर्वांत मोठा व लोकप्रिय सण आहे जो आता देशभर साजरा केला जातो. दहा दिवस साजरा होणारा हा सण बुध्दी व विद्येचे दैवत असणार्‍या गणपतीचा आहे. त्याचबरोबर शिव-जयंती, वटपौर्णिमा, मकरसंक्रांती, दसरा इ. सण देखील साजरे केले जातात.


हवामान:
राज्याचा सर्व भाग मान्सून प्रकारच्या हवामानाच्या पट्ट्यात मोडतो. मार्चपासून सुरू असणारा उन्हाळा मे महिन्यात संपतो. जूनच्या आरंभापासून मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. पावसाळ्यात जमिनीवर पसरलेली हिरवळ त्यानंतर येणाऱ्या सौम्य हिवाळ्यात देखील टिकून राहते. मात्र एकदा का उन्हाळा सुरू झाला की हिरवळ वाळून जाते व सर्वत्र रूक्षपणा पसरतो. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पडणारा मोसमी पाऊस जोराचा असतो आणि घाटमाध्यावर त्याचे प्रमाण ४०० सें.मी. वर जाऊन पोहोचते. सह्यादीच्या पश्चिमेकडील, वाऱ्यांच्या दिशेत येणाऱ्या, कोकण भागात मुसळधार पाऊस पडतो. मात्र उत्तरेकडे त्याचे प्रमाण कमी होत जाते. सह्याद्रीच्या पुर्वेकडे पर्जन्यछायेच्या प्रदेश असून मावळ भागातून हळूहळू पूर्वेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी होते व महाराष्ट्र पठाराच्या पश्चिम भागात ते ७० से.मी. इतके खाली येते. सोलापूर व अहमदनगर हे जिल्हे कोरड्या भागाच्या मर्मस्थानीच आहेत. मोसमी ऋतुच्या उत्तरकाळात पूर्वेकडील मराठवाडा आणि विदर्भ या भागात पावसाचे प्रमाण थोडेसे वाढते. मराठवाड्यात थोडासा वळवाचा पाऊस पडतो तर विदर्भात बंगालच्या उपसागरावरून येणारी मोसमी वाऱ्यांची शाखादेखील थोडासा पाऊस देते.

वाहतूक व्यवस्था:
भारतीय रेल्वेचे जाळे राज्यभर आहे व लांबच्या प्रवासाकरीता रेल्वे हे सोयीचे साधन आहे. महाराष्ट्राच्या बहुतेक भागांनामध्य रेल्वे सेवा पुरवते. कोकण भागात कोकण रेल्वे तर इतर काही भागांना पश्चिम रेल्वे सेवा देते. सध्या मुंबई शहरात मोनोरेल व पुणे शहरात मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची (एस.टी) सेवा बहुतेक शहर व खेड्यात उपलब्ध असते. एस.टी.चे जाळे महाराष्ट्रभर पसरले आहे. विशेषत: ग्रामीण विभागात या बसेस लोकप्रिय आहेत. अनेक शहरात एस.टी. बरोबरच खाजगी गाड्यादेखील सेवा पुरवतात.
महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा भारतातील सर्वांत मोठा आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईत आहे.नागपूर व पुणे विमानतळांवरुन देशांतर्गत तसेच काही आंतरराष्ट्रीय उड्डाणेदेखील होतात. औरंगाबाद, रत्नागिरी, कोल्हापूरव सोलापूर येथेही राष्ट्रीय विमानतळ आहेत. मुंबईतल्या बंदरांपासून कोकण किनारपट्टीवरील इतर बंदरात फेरी-सेवा (समुद्रावरून वाहतूक) होत असते. शहरी भागात ३ आसनी रिक्षा तर उपनगरात सहाआसनी रिक्षा लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रात महामार्गांचे मोठे जाळे आहे. मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग हा भारतातील सर्वांत पहिला टोलमार्ग आहे. मुंबई-नागपूर दरम्यानच्या या प्रतीच्या मार्गाचे काम सुरू आहे. मुंबई, न्हावा-शेवा व रत्नागिरी ही महाराष्ट्रातील ३ मोठी बंदरे आहेत.

मुख्य शहरे: 
  • मुंबई - मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. मुंबईत परप्रांतीयांचे लोंढे कायम येत असतात कारण येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.
  • पुणे - शिवपूर्वकाळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानली जाते. हे शहर शैक्षणिकदृष्ट्या प्रगत आहे. येथील शैक्षणिक संस्थांमध्ये शिकण्यास भारत व जगभरचे विद्यार्थी येतात.
  • नागपूर - विदर्भ विभागातील सर्वांत मोठे शहर असलेले नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येथे भरते.
  • औरंगाबाद - मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ येथे आहे. मराठवाडा विभागाचे मुख्यालय औरंगाबाद येथे आहे.
  • नाशिक - हे उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक शहर आहे. दर १२ वर्षांनी येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो.
  • कोल्हापूर- शिवकालापासून व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले हे शहर महालक्ष्मी अंबाबाई मंदिरासाठी हे प्रसिद्ध आहे.
  • सोलापूर- दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर. अस्ताला गेलेल्या कापड गिरण्यांसाठी प्रसिध्द. येथिल सिध्देश्वराचे मंदिर प्रसिध्द.

पर्यटन:
महाराष्ट्र भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक, आर्थिक अश्या सर्व दृष्टीने संपन्न आहे. प्रवासाच्या दृष्टीने चांगले लोहमार्ग, पक्के रस्ते, चांगली आणि स्वस्त क्षुधाशांतीगृहे, धर्मशाळा यांची येथे रेलचेल आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळाने महाराष्ट्रातील पर्यटनव्यवसायाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले असून डेक्कन ओडिसी नावाची विशेष रेल्वे गाडी सुरू केली आहे. अजिंठा लेणी, मुंबई, थंड हवेची ठिकाणे, किल्ले व इतर ऐतिहासिक स्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक दिसून येतात.